गोष्ट दोन बाल्पणांची...
कुण्या एक बागेत खेळत होता एक बाळ
भवरे फिरवायचा, गोट्या खेळायअचा, पतंग उडवायचा तो
सकाळ, दुपार, संध्याकाळ...
चिंच, पेरू, बोरा खात, रोज हे बाळ शाळेत जाई
शाळा सुटली की मात्र, हे बाळ खेळायला जाई
कंप्यूटर नव्हता, टी.व्ही. नव्हता, होता असा तो काळ
रेडियो एकता एकता, झोपी जाई ते बाळ
ते बाळ आता मोठे झाले, तो व त्याची बायको दोघे कमवू लागले
टी.व्ही. आला, कंप्यूटर आला, बदलून गेला काळ
पण कामत ते इतके बुडून गेले, की एकटेच पडले त्यांचे बाळ
चाळीत असता होते मैदान, पण फ्लैट मध्ये ते नाही
तुइशन्स, क्लास्सेस, शाळा, या पलिकडे त्या बाळाला खेळायला वेळच नाही
त्यांचे बाळ आता कंप्यूटर वरच खेळते, आणि संध्याकाळी आई बाबा घरी आले की
त्यांचे भांडणच ऎकते
या बाळाकडे सगळे आहे, नाही फक्त आईची कुशी
या बलाचा संभाळ करतात प्लेग्रुप मधल्या मावशी
काय झाले हे...........असे का झाले....
पूर्वीचे बालपण आता कुठे हरवले??
Tuesday, January 26, 2010
Subscribe to:
Posts (Atom)